मुंबईवर घोषणांचा वर्षाव; ‘मुंबई आय’ प्रकल्प साकारण्यात येणार,

Spread the love

मुंबई; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘लंडन आय’च्या धर्तीवर महालक्ष्मी रेस-कोर्स लगत ‘मुंबई आय’ प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिली. ‘लंडन आय’प्रमाणेच येथे जायंट व्हील बसवण्यात येणार आहे. रेस-कोर्स येथूनच भूमिगत बोगदा तयार करून तो थेट सागरी किनारा मार्गाला जोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित वार्तालाप प्रसंगी केसरकर यांनी विविध घोषणांचा वर्षावच केला. मुंबादेवी, महालक्ष्मी, बाणगंगा, फॅशन स्ट्रीट परिसराचा विकास, कोळी वाड्यात पर्यटकांसाठी स्वतंत्र खोली, मुंबईतील स्काय वॉकना सरकते जीने आणि लिफ्ट, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा इत्यादी घोषणांचा यामध्ये समावेश होता.

महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याची योजना होती, मात्र विरोधामुळे ती बारगळली. आता रेसकोर्स लगत ‘मुंबई आय’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रथम मुंबई महानगरपालिकेने सन २००८मध्ये आणला होता. त्यानंतर राज्य सरकारनेही २०१४मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. भव्य आकाश पाळण्यातून मुंबईचे विहंगम दृश्य पाहता यावे, अशी त्यामागील संकल्पना आहे. केसरकरांनी केलेल्या घोषणेनंतर, या प्रकल्पाला गती मिळणार हे निश्चित आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page