
संगमेश्वर, प्रतिनिधी- भाजपाचे कोकणचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली, रत्नागिरी (द.) भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुक्याची सर्वसमावेशक जंबो कार्यकारिणी घोषित करणेत आली.
हि कार्यकारिणी तयार करताना सामाजिक स्थान, कार्यक्षमता आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यासाठी वेळ देण्याची तयारी या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे.
“नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तसेच संपूर्ण कार्यकारिणी हे एक कुटुंब असून त्यांचा कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. येत्या तीन वर्षांसाठी मी व माझे सहकारी संघटनेसाठी राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन काम करून पक्षाला तालुक्यात वेगळ्या उंचीवर नेणेसाठी प्रयत्न करीन” असे नुतन तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी सांगितले .
या नुतन जंबो कार्यकारणीत १० उपाध्यक्ष. ३सरचिटणीस. १ कोषाध्यक्ष व ९ चिटणीस असून ८० जणांची सदस्य म्हणून नेमणुक केली .