दिवा डम्पिंग कायमस्वरूपी बंद !
मनसे नेते अभिजीत पानसे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद !
तुम्ही दिवावासीय नसताना सुद्धा डम्पिंगच्या आंदोलनाची पहिली ठिणगी दिव्यात पाडली, दिवेकरांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून स्वतःच्या श्वासाचा कोंडमारा करून तुम्ही डम्पिंग वर झोपडी बांधून राहिले ते प्रशासनाने या तीव्र आंदोलनाची दाखल घ्यावी म्हणूनच आणि सहा महिने का होई ना डम्पिंग दिव्यातून हद्दपार करून दाखवली होती. आज कोणी कितीही श्रेय घेऊ दे पण दिवा डम्पिंग बंद होण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि हे दिवेकरांच्या कायम स्मरणात राहील. आपल्या आंदोलनाला उशिरा का होईना १००% यश आलेलं आहे म्हणून समस्त दिववासियांतर्फे अभिजीत पानसे साहेब व आयुक्त अभिजीत बांगर साहेब यांचे मनपूर्वक धन्यवाद !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर सचिव श्री.प्रशांत प्रभाकर गावडे