जनशक्तीचा दबाव न्यूज | लातूर | फेब्रुवारी ०३, २०२३.
संदल मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून एका युवकाचा चाकूने भाेसकून खून केल्याची घटना लातुरात गुरुवारी रात्री उशिरा घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आराेपीला अटक करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले कि, लातूर शहरात गुरुवारी रात्री संदल मिरवणूक निघाली हाेती. दरम्यान, या मिरवणुकीत तरुण नाचत हाेते. यावेळी धक्का लागल्याच्या कारणावरून फैजान आरिफ कुरेशी (वय १८, रा. भाेई गल्ली, दयानंद राेड, लातूर) याच्यामध्ये आणि जैद जावेद सय्यद (रा. बाैद्धनगर, लातूर) या दाेघांमध्ये शिवीगाळ, बाचाबाची झाली. या वादातूनच जैद सय्यद याने फैजान आरिफ कुरेशी याच्या पाेटात चाकू खुपसून खून केला. ही घटना ताजोद्दीन बाबा दर्गा रोड लातूर येथील एका एका जीमसमोर गुरुवारी रात्री घडली.
घटनास्थळी अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर घटनास्थळी तातडीने पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी मयत फैजल आरिफ कुरेशी याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. याबाबत मयत युवकाचा भाऊ रेहान आरिफ कुरेशी (वय २०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जैद जावेद सय्यद याच्याविराेधात गु.र.नं. ८२/२०२३ कलम ३०२, ५०४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी जैद जावेद सय्यद याला पाेलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तपास सहायक पाेलिस निरीक्षक बी. बी. खंदारे करत आहेत.