
मुंबई : एका बड्या नेत्याच्या घरासमोरुन मिरवणूक चालली, त्याचा आपल्या नातवाला त्रास होतोय, म्हणून हा बडा नेता भाष्य करेल, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर मनसे सरचिटणीस आणि राज ठाकरेंच्या वहिनी शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘संबंध नसताना जर राज ठाकरेंच्या नातवावर राजकारणासाठी बोललात, तर
मनसेची महिला सेना कानाजवळ डी.जे वाजवला जाईल असा इशारा शालिनी ठाकरेंनी दिला आहे.
अंधारे बाई, यापुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी.जे वाजवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा शालिनी ठाकरेंनी दिला आहे.