संगमेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
संगमेश्वर , प्रतिनिधी- कत्तलीसाठी अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून पाच बैल आणि टेम्पो संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
▶️संगमेश्वर पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार अमोल आकाराम कांबळे वय 38 आणि अक्षय शामराव पाटील व 24 वर्षे राहणार सावर्डे खुर्द तालुका शाहूवाडी हे दोघे त्यांच्या ताब्यातील 407 टाटा टेम्पो नंबर एम एच 09 ई एम 1654 मध्ये पाच बैल गाडीच्या हौद्या मध्ये दाटीवाटीने कमी जागेत दोरीने बांधून जनावरे वाहतुकीचा कोणताही परवा नसताना गैर कायदा कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी पोलीस किशोर जोयशी, सचिन कामेरकर, विनय मनवळ, गणेश बिक्कड चालक सिद्धेश अंब्रे, रोहित पाटील आदि सह सापळा रचून गुरुवारी सकाळच्या दरम्यान संगमेश्वर ते देवरुख जाणाऱ्या रोडवरील लोवले सीमेची वाडी या ठिकाणी पकडले.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गणेश बाबासाहेब बिक्कड यांनी फिर्याद दिली असून अमोल कांबळे अक्षय पाटील या दोघांच्या विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले.