मुंबई (शांताराम गुडेकर )-
वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे संस्थापक/अध्यक्ष मा.डॉ.अविनाशजी सकुंडे यांच्या आदेशानुसार व AIACPC चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व वर्ल्ड ह्यूमन राईट्स ए.एफ (WHRAF) चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री.जितेंद्र दगडु(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही संघटनेच्या वतीने दिनांक ०१/१०/२०३३ रोजी साई धाम मंदिर सभागृह,चिंचपोकळी (पूर्व),येथे दोन्ही संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.WHRAF चे महाराष्ट्र सचिव पदी श्री.राकेश कुमार शर्मा,WHRAF चे मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी श्री.प्रकाश वाणी,WHRAF मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.सचिन भांगे,AIACPC चे पुणे जिल्हा अध्यक्ष पदी श्री.सुभाष देनकर, WHRAF चे मीरा भाईंदर अध्यक्ष पदी श्री.स्टीवन कार्डोजा, AIACPC चे भाईंदर शहर अध्यक्ष पदी श्री.विवेक कमल ठाकुर,AIACPC चे मीरारोड शहर अध्यक्ष पदी श्री.करन गज्जला,WHRAF चे मीरारोड शहर उपाध्यक्ष पदी श्री.यश जोशी यांना ओळखपत्र देण्यात आली.तसेच या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता सौ.वसुधा वाळुंज यांची निराधार आणि शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचा महिला कार्याध्यक्षा पदी नेमणूक झाल्याबद्दल शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. अनिता घोष,AIACPC चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे, WHRAF नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.कृष्णा कदम,मुंबई सचिव श्री.महेश आंब्रे,मुंबई सह सचिव श्री.साक्षत मात्रे, IHRAO चे श्री.सुहास परब,श्री.लितेश केरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना यानिमित्ताने अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात आल्या.