स्व. बाळासाहेब पित्रे स्मृती जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद आणि मानांकन स्पर्धा देवरुख येथे संपन्न.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०२, २०२३.

देवरुख | प्रमोद हर्डीकर

रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (RDBA) यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे..

पुरुष एकेरी : विजेता – मयूर कांबळे, उपविजेता – राजस महागावकर.

महिला एकेरी : विजेती – नेहा गोखले, उपविजेती – तेजस्वी पिलणकर.

पुरुष दुहेरी : विजेते – विनीत पाटील / सुधीर चैनुरू, उपविजेते – अनुरूप भगत / मयूर कांबळे.

पुरुष एकेरी ४५ + : विजेते – नरेश पेढांबकर, उपविजेते – विश्वास शिगवण.

पुरुष दुहेरी ४५ + : विजेते – निनाद लुब्री / संदेश कलगुटकर, उपविजेते – नरेश पेढांबकर / विश्वास शिगवण.

मिश्र दुहेरी : विजेते – मयूर कांबळे / सानिका सुतार, उपविजेते – अनुरूप भगत / नेहा गोखले.

१३ वर्षाखालील मुले : विजेता – सुमेध सुर्वे, उपविजेता – अंश ढेकणे.

१३ वर्षाखालील मुली : विजेती – प्रगती हिप्परकर ,उपविजेती – तेजस्वी हिप्परकर.

१५ वर्षाखालील मुले : विजेता – यश भोंगले, उपविजेता – धैर्य जाधव.

१५ वर्षाखालील मुली : विजेती – नेहा मुळ्ये, उपविजेती – कस्तुरी काटकर.

१५ वर्षाखालील मुले दुहेरी : विजेते – आर्यन वेल्हाळ / यश भोंगले, उपविजेते – दानिश कारेकर / धैर्य जाधव.

१७ वर्षाखालील मुले : विजेता – रोमित कलगुटकर, उपविजेता – यश भोंगले.

१७ वर्षाखालील मुली : विजेती – नेहा मुळ्ये, उपविजेती – आर्या खेडेकर.

१९ वर्षाखालील मुले : विजेता – शायन गवाणकर, उपविजेता – सिद्धेश फणसेकर,

▪️बक्षीस समारंभ प्रसंगी माजी आमदार डाॅ. सुभाष बने, महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट असो चे खजिनदार आणि मुख्य प्रायोजक वैजनाथ जागुष्टे, BAST चे जेष्ठ सदस्य महेश शेठ मंथरा, देवरुख न.प. चे नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, BAST अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई, BAST उपाध्यक्ष दिलीप विंचू, आठल्ये सप्रे पित्रे ज्युनिअर कॉलेज अध्यक्षा ऍड. सौ वेदा प्रभुदेसाई, MBA सदस्य अमित मुळ्ये, RDBA उपाध्यक्ष राजेश आराध्यमठ, सेक्रेटरी रजनीश महागावकर, जेष्ठ व्यापारी नाना कोळवणकर आदि उपस्थित होते.

या स्पर्धेदरम्यान संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखर निकम, युवा नेते अनिरुद्ध निकम, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, रत्नागिरी जिल्हा बॅंक संचालक सुर्वे, तुषार बिजितकर, नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, भाजपा ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद हर्डीकर, आंतराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू डॉ. सचिन पानवलकर आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

बक्षीस समारंभादरम्यान देवरुखमधील कॅरमपट्टू द्रोण हजारे तसेच गुंजन खवळे यांची राष्ट्रीय कॅरम संघात निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन BAST तर्फे माजी आमदार सुभाषजी बने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन BAST चे सचिव रविकांत कदम यांनी केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी BAST चे खजिनदार राजेश जागुष्टे, कार्यकारी मंडळ सदस्य अभिषेक अग्रवाल, संजय पटेल यांसह स्पर्धा समिती प्रमुख हरेश पटेल, सदस्य मोहन हजारे, डॉ. प्रमोद भालेकर, प्रणव जोशी, वरद शिंदे, सोहम प्रभुदेसाई, आकांक्षा उपाध्ये, विनोद राठोड, तसेच BAST चे सर्व सदस्य आणि देवरुखमधील बॅडमिंटन प्रेमी खेळाडू यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page