मोठी बातमी! भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन..

Spread the love

दिल्ली, सप्टेंबर 25, 2023-
गाझियाबादमधील हिंडन एअरबेस येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘C-295 MW’ (C295 Transport Aircraft) हे विमान आज २५ रोजी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाले. राजनाथ सिंह यांनी हिंदू शास्त्रानुसार विमानावर स्वस्तिक काढत त्याची पूजा केली. C-295 हे वाहतूक विमान आहे जे सैन्य आणि मालवाहतुकीसाठी डिझाइन केलेले आहे. हे विमान सर्व प्रकारच्या धावपट्टीवर उतरण्यास सक्षम आहे. विमानात ऑटो रिव्हर्स क्षमता असून १२ मीटर अरुंद धावपट्टीवर १८० अंशात वळण्यास सक्षम आहे.

‘भारत ड्रोन शक्ती 2023’ कार्यक्रम आजपासून सुरू झाला आहे. गाझियाबाद येथील भारतीय हवाई दलाच्या हिंडन हवाई तळावर आज आणि उद्या असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डीआरओ फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील सहभागी झाले होते. तसेच हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात ५० हून अधिक ड्रोनचे थेट हवाई प्रात्यक्षिक होणार आहे. त्याचवेळी, C-295 विमान (C295 Transport Aircraft) देखील आज अधिकृतपणे भारतीय हवाई दलाचा भाग बनले. राजनाथ सिंह यांनी हे विमान भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले. काही दिवसांपूर्वी एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीने भारताला C-295 विमाने सुपूर्द केली होती. एकूण ५६ C-295 विमाने हवाई दलात समाविष्ट केली जाणार आहेत. त्यापैकी ४० विमाने ‘मेक इन इंडिया’च्या आधारे भारतात तयार केली जातील. ही विमाने टाटा आणि एअरबस संयुक्तपणे तयार करत आहे.

C-295 विमानांच्या समावेशानंतर, एवरो – ७४९ विमाने टप्प्याटप्प्याने बंद केली जातील. ७० च्या दशकातील या विमानाची जागा अत्याधुनिक C-295 विमान घेणार आहे. यामुळे भारताची संरक्षण व्यवस्था सुधारली जाईल.

संरक्षण उत्पादनात भारताची क्षमता वाढवण्यासाठी मोदी सरकारने तीन वर्षांपूर्वी संरक्षण शस्त्रांच्या आयातीवर बंदी घातली होती. देशात संरक्षण कॉरिडॉरच्या उभारणीवरही सरकारने भर दिला आहे. परंतु तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, C295 एकाच वेळी भारताला अशा टप्प्यावर आणेल जिथे विमान निर्मितीची संपूर्ण स्वदेशी क्षमता शक्य होईल.

C-295 विमानाची वैशिष्ट्ये

हे विमान ताशी ४८० किलोमीटर वेगाने ११ तास उड्डाण करू शकते.
अपघातग्रस्तांना आणि आजारी लोकांना बाहेर काढण्यासाठीही या विमानाचा वापर केला जाऊ शकतो.

सैन्य आणि उपकरणे जलद वाहतुकीसाठी विमानात मागील रॅम्प दरवाजाने सुसज्ज आहे.
हे विमान विशेष ऑपरेशन्स तसेच आपत्तीच्या परिस्थितीत आणि किनारी भागात गस्त घालण्यास सक्षम आहे.
नवीन विमानाची वाहतूक क्षमता ५ ते १० टन आहे.
C-295 विमान सैनिकांना उतरवण्यासाठी आणि पॅराशूटच्या साहाय्याने सामान टाकण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page