जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०२, २०२३.
मुंबईमध्ये ज्या लोकल ट्रेन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला त्याच लोकलखाली उडी मारून एका मोटरमनने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
२६ जानेवारी रोजी सर्वत्र प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. पण मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर मन हेलावून टाकणारी घटना घडली. दुपारी १२.४७ च्या सुमारास एका व्यक्तीने धावत्या लोकलच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राकेश गौड आहे. ते पश्चिम रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत होते.
राकेश गौड हे बऱ्याच वेळ विलेपार्ले स्थानकावर बऱ्याच वेळ उभे होते. लोकल येण्याची ते सारखे वाट पाहत होते. लोकल जशी स्थानकावर येणार असं दिसलं तेव्हा गौड यांनी रुळावर उडी मारली आणि खाली झोपले. लोकलचा वेग कमी होता पण तोपर्यंत बराच उशीर झाला. गौड यांचा जागीच मृत्यू झाला.