जनशक्तीचा दबाव | कोल्हापूर | फेब्रुवारी ०२, २०२३.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या मातृसेवा हॉस्पिटलमधल्या गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसुरकर यांच्या सहकार्याने सापळा रचून गर्भलिंग निदानाचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलंय. २० हजार रुपयांत गर्भलिंगनिदान करताना डॉ. अरविंद कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे.
डॉ. अरविंद कांबळे यांच्यावर यापुर्वीही काही गंभीर आरोप झाले आहेत. तर गर्भलिंग निदानासाठी डॉ. कांबळे जे मशिन वापरत होते, ते मशीन २०१६ पासून सील आहे. तरीही सील तोडून या मशीनचा अनधिकृत वापर सुरू होता. याबाबत आता अधिक तपास सुरू आहे.