
कर्जत(नेरळ): सुमित क्षीरसागर
कर्जत : – सध्या देशात व राज्यात गणेश उत्सव व गणेशाच्या आगमनाची जोरदार गणेश भक्तांची लगभग पाहावयास मिळत आहे. तर सर्वत्र बाजार पेठाही मोठया प्रमाणात सजलेल्या आहेत. तर हा उत्सव आनंदात पार पडावा व या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देशात व राज्यात पोलीस हे सज्ज झोले असताना, कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याकडून कायदा सुव्यवस्था राखण्या प्रति नेरळ मध्ये रूटमार्च काढण्यात आला आहे.


सदर रूटमार्च हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या उपस्थितीमध्ये पोलीसांसह नेरळ पोलीस ठाणे ते कर्जत कल्याण – कर्जत राज्य मार्ग, ब्राम्हण आळी ते मारूती मंदिर, नेरळ मुख्य बाजारपेठ, नेरळ रेल्वे स्थानक, नेरळ खांडा, कल्याण – कर्जत राज्य मार्ग ते नेरळ पोलीस ठाणे असा काढण्यात आला आहे.

तर गणेश उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, व नेरळ व नेरळ पोलीस ठाणा हद्दीत यंदाच्या गणेश उत्सवा दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे ही सज्ज झाले आहे.