पुणे, परराज्यातील शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्याकरीता आंबा उत्पादकांनी नोंदणी करण्याचे आवाहन…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०२, २०२३.

आंबा हंगाम २०२३ करीता आंबा उत्पादकांना आंबा विक्रीकरीता पुणे आणि राज्यातील/परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्याकरीता आंबा उत्पादकांची नोंदणी ०६ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर ना. पाटील यांनी दिली.

स्टॉल नोंदणीकरीता आंबा नोंदीसह ७/१२ उतारा (मागील ६ महिने कालावधीतील), आधार कार्ड तसेच स्टॉलवर विक्री करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड प्रत व कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र भौगोलीक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रत, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे नावे रु. १०,०००/- अनामत रक्कमेचा धनाकर्ष अथवा यापूर्वी अनामत रक्कम भरणा केली असल्यास पावतीची प्रत तसेच विहीत नमुन्यातील अर्ज व हमीपत्र इ. कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत.

इच्छूक आंबा बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी आवार, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी (०२३५२-२९९३२८) अथवा श्री. कपिल खामकर, कृषि व्यवसाय पणन तज्ञ (८८०५६५२२३३) यांचेशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन कृषि पणन मंडळाचे वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस २८ फेब्रुवारी २०२३ आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page