जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०२, २०२३.
जवाहर नवोदय विद्यालय, पडवे (ता. राजापूर) मध्ये इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली असून ती ८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. निवड चाचणी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठीची मुदत मुदत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत होती.
ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक https://navodaya.gov.in अशी आहे. जिल्ह्यात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.