जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | फेब्रुवारी ०२, २०२३.
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव यांच्या एम.एम.एस. विभागाने आयोजित केलेल्या ‘एक्सप्लोअर-२०२३’ स्पर्धेत आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात मोलाची भर घातली.
पोस्टर मेकिंग स्पर्धेत साहिल सुरेश मोवळे याने विजेतेपद तर सुयोग चंद्रकांत रहाटे याने उपविजेतेपद मिळविले. रांगोळी स्पर्धेत सुयोग चंद्रकांत रहाटे व आर्यन राजेंद्रदास शिंदे यांनी उपविजेते मिळविले.
बिझनेस क्विझ स्पर्धेत पृथ्वीराज महादेव तावडे व सर्वेश आनंद खानविलकर यांनी विजेतेपद तर मुग्धा दीपक अंकुशराव व सिद्धी संतोष खामकर यांनी उपविजेतेपद मिळविले. बेस्ट पर्सनॅलिटी स्पर्धेत श्रावणी हेमंत नार्वेकर हिने विजेतेपद प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्याना सुरज मोहिते, विलास रहाटे, प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रिया मोरे, प्रा. प्रतीक लिंगायत, प्रा. अजिंक्य नाफडे, प्रा. सुदीप कांबळी यांनी मार्गदर्शन केले.
संस्थाध्यक्ष श्री. सदानंद भागवत, श्रीम. नेहा जोशी, श्री. कुमार भोसले, श्री. शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, डॉ. वर्षा फाटक, प्रा. सुभाष मायंगडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.