घमांडिया आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यांच्याकडे ना धोरणे आहेत, ना मुद्दे आहेत आणि नाही नेता आहे. सनातन धर्मावर हल्ला करण्याचा त्यांचा छुपा अजेंडा आहे, ज्याचा त्यांना नाश करायचा आहे, अशीही टीका त्यांनी केली.
सनातन धर्मावरील टीकेवर नरेंद्र मोदींचं प्रत्युत्तर
“जगातील सर्वांत प्राचीन धर्मांपैकी एक असलेल्या सनातन धर्माचा पाया उद्ध्वस्त करण्याचा घमंडिया युतीचा दुष्ट हेतु आहे. या इंडिया आघाडीतील लोकांना स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांना प्रेरित करणारा सनातन धर्म पुसून टाकायचा आहे. त्यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. गुरुारी ते मध्य प्रदेशाीतील सागर जिल्ह्यातील बीना रिफायनरी पायाभरणी प्रकल्पात बोलत होते.
“आज त्यांनी खुलेआम सनातन धर्माला टार्गेट केलं आहे. उद्या ते आमच्यावर हल्ले करतील. देशातील तमाम सनातनी आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आता सावध राहावं. आम्हाला अशा लोकांना रोखावं लागेल”, असंही मोदी म्हणाले.
“घमंडिया आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यांच्याकडे ना धोरणे आहेत, ना मुद्दे आहेत आणि नाही नेता आहे. सनातन धर्मावर हल्ला करण्याचा त्यांचा छुपा अजेंडा आहे. या धर्माचा त्यांना नाश करायचा आहे”, अशीही टीका त्यांनी केली.
द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. सनातन धर्म नष्ट होणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले होते. तसंच, कुष्ठरोगासह सनातन धर्माची तुलना केली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनीही उदयनिधी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटकपक्षावर टीका केली आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेशला पिछाडीवर ठेवले.
“या राज्यावर अनेक दशके राज्य करणार्या पक्षाने (काँग्रेस) इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर ठेवले. मागील पिढ्यांतील लोकांना आठवत असेल की काँग्रेसने राज्याच्या बुंदेलखंड प्रदेशाला पाणी, विजेची मागणी अर्धवट ठेवली होती. आज भाजपच्या राजवटीत प्रत्येक गावात नवीन रस्ते बांधले गेले आहेत आणि प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवली गेली आहे. मला खात्री आहे की, येत्या काळात मध्य प्रदेश औद्योगिकीकरणाच्या बाबतीत नवीन उंची गाठेल”, पंतप्रधान मोदी म्हणाले