अयोध्या ,उत्तर प्रदेश- या छायाचित्रांमध्ये पुरातन काळातील मुर्त्या, स्तंभ तसेच शिलालेख दिसत असून हा प्राचीन दस्तावेज एकत्रित ठेवला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या खोदकामादरम्यान प्राचीन मुर्त्या आणि स्तंभांचे अवशेष मिळाले असून श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव संपत राय यांनी सोशल मिडियावर याचे छायाचित्रे टाकत ही माहिती दिली. या छायाचित्रांमध्ये पुरातन काळातील मुर्त्या, स्तंभ तसेच शिलालेख दिसत असून हा प्राचीन दस्तावेज एकत्रित ठेवला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
संपत राय हे श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट मध्ये सचिव पदावर असून त्यांनी मंदिर बांधणीच्या खोदकामादारम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिरातील अवशेषांचे छायाचित्र ट्विटरवर टाकले आहेत. या अवशेषांमद्धे पुरातन काळातील मंदिरांचे अवशेष, प्राचीन मुर्त्या, दगडी स्तंभ तसेच शिलालेख यांचा समावेश आहे. मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम होत असताना 40 ते 50 फुट जमिनीखाली हे पुरातन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. आता, मंदिराच्या बांधणीनंतर हे अवशेष भाविकांना दाखवण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने मंदिर बांधणीबाबत दिलेल्या निकालानंतर श्रीराम मंदिराचे बांधकाम जोमाने सुरू आहे. त्यात आता मंदिरांखाली पुरातन अवशेष सापडल्यामुळे हिंदू पक्षकारांचा या जागेवरील दावा आणखी दृढ झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मंदिर-मशीद वादतील या सुनावणीदरम्यानही याआधी मंदिराखाली सापडलेल्या प्राचीन अवशेषांंना विचारात घेऊन निर्णय दिला होता.
कधी पूर्ण होणार श्रीराम मंदिर?
राम मंदिराचे निर्माणकार्य अगदी तेजीत चालले असून मंदिराचे जवळजवळ 80% काम पूर्ण झाले आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत मंदिराचे काम पूर्णत्वास येणार असून मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि पाचशेहुनअधिक साधुसंतांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन होणार आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात होणार असून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडाआधी धार्मिक विधींना सुरुवात हौईल