दिवा : डम्पिंग ग्राउंड कायमचे बंद करण्याची घोषणा ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी केल्यानंतर दिवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन पेढे भरवुन आनंद व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या ठाणे नेतृत्वाने डम्पिंग विरोधातील आंदोलनात नेहमीच दिव्यातील जनतेला यांना पाठिंबा दिल्याने व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने दिवा भाजप मंडळाच्या वतीने दोन्ही आमदारांचे आभार मानण्यात आले.यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की दिव्यात डम्पिंग विरोधात सातत्याने आंदोलन करण्याचा सपाटा भारतीय जनता पार्टीचे दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे व अन्य कार्यकर्त्यांनी सुरू ठेवला होता. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच डंपिंग विरोधात सर्वाधिक आंदोलन झाले.दिव्यातील जनतेचा आरोग्याचा हा प्रश्न असल्याने यासाठी पालिका आयुक्तांकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांची भेट घेऊन हे डम्पिंग तातडीने बंद करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
अखेर जनतेच्या दबावा पुढे झुकून पालिका प्रशासनाने दिवा डंपिंग बंद केल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. त्याचबरोबर दिवा भाजपचे सर्व पदाधिकारी मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे महानगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक गटनेते यांनी निर्माण केलेल्या दबाव गटामुळे पालिका प्रशासनाला दिवा डंपिंग बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला ,असे मत आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर अशोक पाटील ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत सरचिटणीस समीर चव्हाण दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत वार्ड अध्यक्ष नागेश पवार आदी दिवा भाजप मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.