भजन मंडळांनी सादर केली भजनकला!
जनशक्तीचा दबाव न्यूज | संदीप खानविलकर / गणपतीपुळे | सप्टेंबर १०, २०२३.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने शनिवारी संपन्न करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम मंदिरात शनिवारी सकाळी दहा ते रात्री दहा अशा बारा तासांच्या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करण्यात आला. आहे .
या अखंड हरिनाम सप्ताहात मराठवाडी वरचावठार, मधला वठार,खालचा वठार, सुतार समाज, तेली समाज यांनी आपली भजन कला सादर केली. त्यानंतर या अखंड हरिनाम सप्ताह उत्सवामध्ये भगवतीनगर जांभूळवाडी येथील भजनमंडळ , गोपाळकृष्ण भजनमंडळ मालगुंड भंडारवाडा, गोपाळकृष्ण महिला भजन मंडळ मालगुंड भंडारवाडा आदींनी आपली हजेरी लावून भजन कला सादर केली.
अतिशय रंगतदार झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह उत्सवातील भजन कलेची सांगता शनिवारी रात्री दहा वाजता करण्यात आली.
हा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी मालगुंड येथील श्रीराम मंदिराचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोठी मेहनत घेतली.