जनशक्तीचा दबाव न्यूज | शंकर वैद्य / साखरपा | सप्टेंबर १०, २०२३.
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीकच्या पुर्ये तर्फे देवळे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गौतम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गौतम पवार यांनी यापूर्वी दोन वर्षे तंटामुक्ती अध्यक्षपद भूषविले आहे. गावातील तंटे पोलीस स्टेशन पर्यंत न जाता गावातच मिटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
यावेळी सरपंच शितल गार्डी, उपसरपंच बापू लोटणकर, ग्रामसेवक श्री. कांबळे, संतोष पांगळे, मधुकर पवार, अनुष्का भोवड, भरत गोरुले, वसंत भोवड, तानाजी गोरूले, शांताराम भोवड आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गौतम पवार यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.