जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | सप्टेंबर ०९, २०२३.
संगमेश्वर तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धा श्रीम. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल, देवरूख येथे संपन्न झाल्या. उद्घाटनासाठी निवृत्त नौदल अधिकारी अमर चाळके, मुख्याध्यापिका दीक्षा खंडागळे, संगमेश्वर तालुका क्रीडा समन्वयक अभिजीत कदम, क्रीडा शिक्षक तानाजी कदम, साक्षी नलावडे तसेच विविध शाळांतून आलेले क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक व संघ व्यवस्थापक यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. या तालुकास्तरीय स्पर्धेत पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल तसेच आश्रम शाळा, निवे या संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी यशस्वी झालेले खेळाडू गटवार खालील प्रमाणे:-
१४ वर्षांखालील मुले- चिन्मय टिपुगडे, आरुष चव्हाण, अजिंक्य पाटील (पी. एस. बने), वेदांत मायंगडे, मिझान साटविलकर (पाध्ये स्कूल). १४ वर्षांखालील मुली- नेहा वराळे, शाल्मली वाघमारे, आयुषी कुर्लीकर, नभा मांगले (पाध्ये स्कूल), मुद्रा भालेकर (पी. एस. बने). १७ वर्षांखालील मुले- ओंकार गिड्ये, ओम मायंगडे, शौनक आठल्ये, अनुराग पंडित (पाध्ये स्कूल), ओम कानार (पी. एस. बने). १७ वर्षांखालील मुली- गायत्री बने, धार्मि पटेल, अस्मिया साटविलकर (पाध्ये स्कूल), सुमेधा मांगले, प्राची मांगले (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख). १९ वर्षांखालील मुले- चिराग पवार (ए. एस. पी. कॉलेज, देवरुख), आदित्य जाधव, सुरज गोताड, अजिंक्य शिगवण, सोहम कदम (आश्रम शाळा, निवे). १९ वर्षांखालील मुली- सानिया गोताड, पूर्वा करंडे, तन्वी आगरे (आश्रम शाळा, निवे).
या स्पर्धा उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी पंचप्रमुख अमर चाळके यांचे अनमोल सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उत्तम आयोजनासाठी आणि यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, राजेंद्र राजवाडे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, मुख्याध्यापक मधुकर कोकणी व सोनाली नारकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.