iPhone 15 Series : आयफोन 15 सीरिजबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणली गेली होती. अखेर लाँचिंग डेटबाबत खुलासा झाला असून काय खासियत असणार आहे ते जाणून घेऊयात.
मुंबई : ॲपल कंपनीची आयफोन सीरीज दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाते. सध्या आयफोन 15 सीरिजची उत्सुकता ताणली गेली आहे. काही अवघ्या काही तासानंतर आयफोन 15 सीरिज लाँच होणार आहे. आयफोन 15 सीरिज भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये 12 सप्टेंबरला लाँच होणार आहे. यात कंपनी 4 नवी आयफोन लाँच करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ॲपल वॉच सीरिज 9 आणि ॲपल वॉच अल्ट्रा 2 ही सादर करणार आहे. आयफोन 15 सीरिजमध्ये वेगळं काय असेल याबात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. टीपस्टर्स अनेक गोष्टी पुढे आणल्या गेल्या आहेत. त्यांनी केलेला खुलासा आणि प्रत्यक्षातील आयफोन 15 यात तसंच काही असेल का? याबाबत उत्सुकता आहे. आयफोन 15 लाँच झाल्यानंतर प्रत्यक्षात विक्री कधी सुरु होईल? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
iPhone 15 सीरिजची विक्री कधी सुरु होईल?
ॲपल कंपनी आयफोन 15 सीरिजमध्ये 4 नवे स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. लाँचिंगनंतर स्मार्टफोनची विक्री 22 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या सीरिजमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या फोनच्या किमतीत वाढ होऊ शकते. दहा ते 15 हजार रुपयांपर्यंत किंमत वाढू शकते. आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स तुलनेने महाग असतील.
रिपोर्टनुसार, आयफोन 15 प्रोची किंमत 91 हजार रुपयांपासून सुरु होईल. तसेच आयफोन 15 प्रो मॅक्स 1,08,000 रुपयांना मिळेल. ही किंमत अमेरिकेत असणार आहे. त्यामुळे भारतात आणखी जास्त किंमत असेल.
iPhone 15 मध्ये काय असेल खास?
लीक रिपोर्टनुसार, आयफोन 15 पारंपरिक ब्लॅक आणि व्हाईट रंगांसह पिवळ्या, पिंक/लाल आणि निळ्या रंगात मिळू शकतो. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. तर आयफोनमध्ये सी टाइप चार्जिंग पोर्ट असेल. नॉन प्रो मॉडेल्ससाठी 20 व्हॅट आणि प्रो मॉडेलसाठी 35 व्हॅटचा चार्जर मिळेल. तसेच आयफोन 15 प्रोचं वजन कमी असेल. यात टायटॅनिम चेसिसचा वापर होईल. प्रो व्हेरियंटमध्ये मोठी स्क्रिन आणि ए17 बायोनिक चिपसेट असेल. तसेच नॉन प्रो व्हेरियंटमध्ये ए16 बायोनिक चिप असेल.