चिपळूण एकता विकास मंचच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भविष्यात ही संघटन शक्तीशाली बनेल व चिपळूणचे नेतृत्व करेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
शहरातील परांजपे हायस्कूल येथे पार पडलेल्या या शिबिराचे आ. निकम यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कोशाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात आ. निकम बोलत होते. या वेळी त्यांनी संघटनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देवून, महाआरोग्य शिबीर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
या वेळी व्यासपीठावर आ. निकम यांच्यासमवेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष श्री. वसंतशेठ उदेग, कार्याध्यक्ष श्री. शिरीष काटकर, श्री. हेमंत शिरगांवकर, जिल्हा बँक संचालिका श्रीम. दिशाताई दाभोळकर, श्रीराम एज्युकेशनचे श्री. राजन खेडेकर, प्रसिद्ध ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ. अब्बास जबले उपस्थित होते.