
संपादकीय: सह्याद्रीचे उंच उंच कडे, त्यातून जाणारे नागमोडी रस्ते, हिरवी गर्द वनराई आणि धुक्याची चादर.. कशेडी घाट म्हटलं की आपल्याला हेच आठवतं. पण कशेडी घाट पार करताना नागरिकांना घाम फुटत होता. वळणावळणाच्या रस्त्यामुळे वाहतुकीचा सामना करावा लागायचा. पण आता कोकणवासीयांचं हे टेंशन दूर झालंय. जो कशेडी घाट पार करायला १ तास लागायचा, तेच अंतर आता अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे. आणि याचं कारण म्हणजे कशेडी बोगदा !
चव्हाण साहेबांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा हाती घेतल्यापासूनच मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करायचा ध्यासच घेतला होता. याचाच एक भाग म्हणून कशेडी टनेल ही गणेशोत्सवापूर्वी कशी सुरू करता येईल या दिशेने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. वारंवार भेट देऊन, पाहणी करून, अपडेट्स घेऊन युद्धपातळीवर ही काम कसे करता येईल यावर लक्ष ठेवून होते. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे.
लवकरच हा कशेडी टनेल वाहतुकीसाठी खुला होईल. या भुयारी मार्गामुळे प्रवाशांची वेळेची आणि पैशांची दोन्हीची बचत होईल.
जाहिरात




