
देवरुख नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष मनिष सावंत, सुबोध लोध, राजु महाडिक, पंकज मांगले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये केला पक्ष प्रवेश …
या प्रवेशाने देवरुख मधील भाजपा झाली अधिक मजबूत .
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण विधानसभा अध्यक्ष प्रमोद अधटराव, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजीत शेटये यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झाला पक्ष प्रवेश..
स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांना देशामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवरूख मधील शिवसेनेचे अनेक वर्षाचे कट्टर शिवसैनिक, देवरुख नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष श्री मनीष सावंत, सुबोध लोध, राजु महाडिक, पंकज मांगले, संजय लिंगायत,अतुल यादव, पृथ्वीराज यादव, समीर कदम, रोहन कदम, युवराज महाडिक, गोविंद सिंग राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला. या प्रवेशामुळे संपूर्ण देवरुख शहरासह प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ मध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. “आमचे अनेक सहकारी भारतीय जनता पार्टी च्या परिवारात येण्यास उत्सुक असून लवकरच त्यांचा देखील पक्षप्रवेश होईल” असे श्री मनिष सावंत यांनी म्हटले आहे.
जाहिरात


