कर्जत: सुमित क्षीरसागर
महिलांनी चूल आणि मूल या बंधनाच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी खूप आधीच केले असून महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून देणे , हे त्यांच्याच कार्याचा भाग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या श्रावणसरी मंगळागौर स्पर्धेत आज ” न भूतो – न भविष्यती ” झालेली महिलांची गर्दी बघून कर्जत तालुका अध्यक्ष रंजना धुळे यांचे कौतुक करत भविष्यात महिलांच्या ज्या पण समस्या असतील त्या सोडविण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू , यासाठी रायगडच्या मंत्री मा. आदिती ताई तटकरे तुमच्या साथीला असतील , असे जोषपूर्ण मत कर्जत – खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष व आरोग्य – शिक्षण – क्रिडा सभापती सुधाकर शेठ घारे यांनी व्यक्त केले.
भविष्यात महिलांची ताकद या मतदार संघात आम्ही वाढवून सर्व समस्या सोडवू , असे माहेरवासिन म्हणूनच आलेल्या सर्व भगिनींना त्यांनी शब्द दिला , ते कर्जत रॉयल गार्डन येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित श्रावणसरी मंगळागौर कार्यक्रमात बोलत होते . यावेळी व्यासपीठावर सुधाकर शेठ घारे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , बंधू देशमुख , शिवाजी खारीक , मधुकर भाऊ घारे , युवा कर्जत तालुका अध्यक्ष शैलेश पालकर , अविनाश कडू , जगदीश देशमुख , महिला तालुका अध्यक्षा ऍड . रंजना धुळे , त्याचप्रमाणे अनेक महिला पदाधिकारी , त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात अनेक कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडून आपल्या कार्याचा ठसा उमटवून येणाऱ्या काळात या मतदार संघाचे नेतृत्व करण्यास सक्षम चेहरा म्हणून सर्वांसमोर आलेले मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली श्रावण महिन्यातील महिलांचा मंगळागौर कार्यक्रम आज भव्य आणि दिव्य स्वरूपात महिलांच्या मोठ्या संख्येत साजरा करण्यात आला . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून , रायगडचे सर्वेसर्वा , खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे , महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे व आमदार अनिकेत दादा तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. उमा मुंढे अध्यक्षा, रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत महिला तालुका अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , सौ . स्वाती कुमार अध्यक्षा, माथेरान शहर व सौ.राजश्री कोकाटे अध्यक्षा, नेरळ शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी जी मेहनत घेतली त्यावरून आजची हि भरमसाठ गर्दी दिसून यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले . आज रविवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता , रॉयल गार्डन – कर्जत, जि. रायगड च्या भव्य सभागृहात ” मंगळागौर झिम्मा फुगडी चां ” नाद महिलांच्या गर्दीचा उच्चांक होवून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित या खेळात विजेत्या महिलेस ” मानाची पैठणी आणि नथ ” तर उपस्थित महिलांना इतर खेळांमधून १६ आकर्षक बक्षिसे देण्यात आली तर या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी खास विशेष आकर्षण मराठी मालिकेतील ● भाग्य दिले तू मला , मा. तन्वी मुंडले (कावेरी) , व • स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मा. पूजा बिरारी (पल्लवी ) या उपस्थित राहिल्याने त्यांनी उपस्थित महिलांचा खूपच उत्साह वाढविला . या खेळात प्रथम बक्षीस २२,२२२/- रू . , द्वितीय बक्षीस १५,५५५/- रू . , तृतीय बक्षीस ११,१११/- रू . , चतुर्थ बक्षिस ७,७७७/- रू. , तर उत्तेजनार्थ – ५,५५५/- आदी बक्षिसे होती . शिवाय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक बक्षिस दिल्याने या बहारदार मंगळागौर कार्यक्रमास महिलांनी खूपच हर्षवर्धक आनंद घेवून सांगता कार्यक्रम पर्यंत महिलांची गर्दी जशीच्या तशी पहाण्यास मिळाली . म्हणूनच या कार्यक्रमास ” न भूतो , न भविष्यती ” अशी महिलांची गर्दीने राजिप मा. उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाला उधाण आल्याचे चित्र पहाण्यास मिळाले.