बजेट सादर होण्यापुर्वी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले..

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | नवी दिल्ली | फेब्रुवारी १, २०२३.

राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बजेट सादर करण्यापुर्वी सरकारवर विश्वास व्यक्त केला. ते म्हटले की, देश कोविडमधून सावरला आहे. सामान्य जनतेली काय मिळणार हे ११ वाजता कळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. त्याअगोदर त्यांच्या नेतृत्वात त्यांचे सहयोगी पंकज चौधरी आणि सचिव सकाळी ९ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटले.

अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड देखील बजेट सादर होण्याअगोदर अर्थमंत्रालयात पोहचले. ते म्हटले की, आर्थिक सर्वेक्षण पाहिले तर सर्व क्षेत्रांमध्ये प्रगति होत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली होती तेव्हा भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावर होती आणि आज ती ५ व्या स्थानावर आहे.

त्यांनी सांगितलं की…

१० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कॅबिनेटची बैठक झाली. देशाला काय मिळणार आहे? हे साधारण दोन तासात कळेल. सर्वांच्या नजरा बजेटवर खिळल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत २०२३-२४ चे सर्वसाधारण बजेट सादर करणार असून याद्वारे निवडणुकीपूर्वी देशाच्या आर्थिक विकासासाठी सरकारची काय तयारी आहे ? हे स्पष्ट होईल.

पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका पाहता मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प लोकाभिमुख असणार आहे. असे लोकांचे मत आहे. कृषी, संरक्षण, शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योग, रेल्वे आणि जवळपास सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांना करमुक्तीपासून सरकार अशा घोषणा करेल ज्यामुळे देशाच्या प्रगतीचा वेग कमी होणार नाही याची खात्री जनतेला मिळेल, असेही आर्थिक तज्ज्ञ सांगत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page