
तुम्ही रोज बसणार, तर आम्ही रोज उठवणार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा विभाग
ठाणे: प्रतिनिधी दिव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन फेरीवाला मुक्त अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असताना धक्कादायक बातमी समोर येत आहे, ठाणे महापालिकेने ज्या अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पदावर बसवलं आहे तेच अधिकारी फेरीवाल्यांना उठवण्यास तयार होत नाहीत. “आम्हाला भीती वाटते”, फेरीवाले आम्हाला मारतात, मारामारी कोण करत बसणार अशी कारणं देतात. अधिकाऱ्यांसोबत असलेले कंत्राटी कामगार सामान उचलायला तयार असतात, पण जोपर्यंत पालिका अधिकारी आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काय करणार अशी प्रतिक्रिया कंत्राटी कामगारांकडून मिळत आहेत. आपलं “कर्तव्य” पार पाडायला जमत नसेल तर, पालिका अधिकाऱ्यांनी स्वेचछानिवृत्ती घेण्यास अडचण आहे?
पालिका अधिकारी काय म्हणाले…व्हिडिओ पहा सविस्तर
पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व सहाय्यक आयुक्त रस्त्यावर उतरताच रस्ता “फेरीवाला” मुक्त होतो, पण जेव्हा हे अधिकारी रस्त्यावर असतात तेव्हा तोच रस्ता फेरीवाला मुक्त का होत नाही, याचं नेमकं “आर्थिक” गणित काय याचा विचार करण्याची नितांत गरज आहे.

सोमवारी सायंकाळी मनसेचे कार्यकर्ते जेव्हा पालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सांगत होते, त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्याला फोन वर फोन येत होते, ते नेमके कशासाठी याचाही विचार होणे गरजेचे आहे. असा प्रश्न दिवेकरांच्या मनात उपस्थित होत आहे.
:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात