
ही वनस्पती आपल्या आसपासच्या परिसरात नक्की पाहायला मिळते. तर ही वनस्पती नक्की कोणती हे आपण पाहूया. रस्त्याच्या कडेला असणारी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे.तर कुरडू नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल या वनस्पतीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले असतात. आपण औषधी वनस्पती व या झाडापासून होणारे अनेक फायदे याविषयी जाणून घेऊया. पहायला सुंदर असलेली ही वनस्पती शेताच्या बांधावर शेतामध्ये पडीत जमिनीवर आपोआप उगवते. याला कुरडू पांढरा कोंबडा मोर पंख असेसुद्धा म्हणतात. ह्या वनस्पती चे अनेक आश्चर्यचकित करणारे फायदे आहेत तेच आपण येथे पाहणार आहोत.
आयुर्वेदानुसार कुर्डू ही वनस्पती अनेक व्याधींवर फायदेशीर आहे. सांधेदुखी जाण्यासाठी, नामर्दाला मर्द बनवणारी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, मुतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे कोणतेही विकार असो म्हणजे दातातील किडा बाहेर काढण्यासाठी दात दुखत असेल तर दुखणे नाहीसे करण्यासाठी कमी करण्यासाठी दातातून रक्त येत असेल तर ते बंद करण्यासाठी याचा फायदा होतो आणि तर ह्या कुरडू वनस्पती ची फुले पाने व मुळे अत्यंत चमत्कारीक असतात.
आणि मित्रांनो ज्या लोकांचे पोट साफ होत नाही, पोटात दुखणे, पोट गॅस धरणे या संबंधीचा त्रास असेल तर या वनस्पतीची चार पाने दोन दिवस सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी चार पाने नक्की खा.खरंतर याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. ग्रामीण भागात जनावरांना ही वनस्पती जास्त प्रमाणात घातले तर त्यांना संडास लागते.ही वनस्पती त्रिदोष नाशक म्हणजे कफ, वात, पित्तशामक आहे. या वनस्पतीच्या फुलांमध्ये काळे व चमकदार बीज असते. हे बीज आयुर्वेदामध्ये अति उपयुक्त मानले जाते . आयुर्वेदानुसार यांच्या बिया मूत्रल, शितल, शक्ती, बुद्धी वाढवणारे, व रुची वाढवणारे असतात, आणि या बिया कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये सहज मिळतील.
किडनी मूत्रपिंडाच्या तक्रारीसाठी कुर्डू वनस्पती चे फायदे
जर आपल्याला वारंवार लघवी होत असेल, लघवी करतेवेळी दुखत असेल, लघवीला जळजळ करत असेल, तर या बियांचे चूर्ण 2 ग्रॅम, आणि खडीसाखर 2 ग्रॅम याप्रमाणे दोन वेळा दिवसातून घेतल्यास आपली लघवी साफ होण्यासाठी मदत होईल. जळजळणे थांबेल आणि लघवीच्या जागी दुखणे सुद्धा थांबेल आणि त्याचबरोबर काही लोकांना पोटासंबंधी चा कोणता विकार नसतो तरी देखील त्यांच्या पोटात दुखणे, पोट गडगडणे अशा समस्या निर्माण होत असतात. तर अशा व्यक्तींनी या वनस्पतीची मुळे चावून-चावून मुळीचा रस पिऊन घ्यायचा.असे तुम्ही तीन ते सात दिवस केले तर पोटासंबंधी कोणत्याही तक्रारी निर्माण होणार नाहीत.
ज्या लोकांना मुतखडा आहे त्यानी हा प्रयोग करून पहा. गोखुळ नावाच्या वनस्पतीच्या तीन ते चार बिया घ्या कुर्डू वनस्पती ची मुळे तेवढ्या आकाराची घ्या.हे दोन्ही एकत्र बारीक करून घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. गोखुळं वनस्पती चे छोटे छोटे खडे बारकाले घ्या. सकाळी ते खडे विरघळलेले दिसते आणि मगच तुम्ही याचा वापर करा.कुर्डू या वनस्पतीची मुळे जर चावून खाल्ली तर आपला पित्ताचा त्रास कमी होतो. कोणत्याही प्रकारच्या पित्ताचा त्रास नंतर होत नाही. तर अशीही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कुरडू वनस्पतीचा वापर तुम्ही नक्की करून पहा.खरंतर निसर्गाच्या सानिध्यात वावरताना आम्ही निसर्गालाच विसरलो आहोत, ही वास्तविकता आहे.
निसर्ग आम्हाला सगळंच देतो पण आम्हाला ते घेता येत नाही,ही आमची मोठी शोकांतिका आहे.खरंतर ही वनस्पती खूप लोकांनी पाहिली असेल,पण आमचं कस आहे आम्हाला फुकट मिळालेल्या गोष्टींचा महत्व कधी येतच नाही.मित्रांनी ही वनस्पती तुम्ही नक्कीच बघितली असणार पण तुम्हाला जर असे आजार असतील तर नक्कीच एकवेळ हा प्रयोग करून बघा,तुम्हाला नक्कीच ह्या आजरांपासून सुटका होईल.
टिप – फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आम्ही कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका


