चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील मुर्तवडे मधलीवाडी चंडिका एकता मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुर्तवडे ते आबलोली या रस्त्यावरील वाढलेली झाडी झुडपे तोडून स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे निश्चितच रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
गणेश उत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे . त्यामुळे निश्चितच या उत्सवामध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गवत आणि झाडी वाढलेली आहे. या झाडी मुळे समोर येणारे वाहन कधी कधी दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर आपल्या गावातून जाणारा जो रस्ता आहे त्याची स्वच्छता व्हावी हा एक उदात्त हेतू ठेवून मुर्तवडे येथील चंडिका एकता मित्र मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवन्यात आली. या मुर्तवडे ते आबलोली जोड रस्त्याची झाडी तोडून स्वच्छता करण्यात आली. एक अतिशय सामाजिक बांधिलकीच काम या मंडळांनी केलेला आहे यासाठी माजी अध्यक्ष- गंगाराम लक्ष्मण मांडवकर व अध्यक्ष- राजाराम गणू मांडवकर व महिला मंडळ तसेच चर्मकारवाडी महिला मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
आपले रस्ते, पाऊलवाटा आणि घराच्या बाजूचा परिसर आपण असाच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चित आपले गाव एक सुंदर आणि आदर्श गाव बनेल. यासाठी अशी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे.