महाराष्ट्र: SSC and HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा ०१ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने २८ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जाहिरात