खेड :- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायन घेऊन मुंबईकडून गोव्याकडे जाणारा टँकर शुक्रवार सकाळच्या सुमारास ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून उलटला . या अपघात चालक जखमी झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक राजसाहेब आनंद बहादुर सिंग ( वय ३२ , रा . तालुका जिगना , जि . मिर्झापूर , राज्य उत्तर प्रदेश ) यांच्या ताब्यातील टँकर ( जीजे ०६ बीटी ७५५५ ) घेऊन तो मुंबई – गोवा महामार्गावरून जात असताना कशेडी घाटातील अवघड वळणावर टँकरचे ब्रेक निकामी झाले . राजसाहेबचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला टँकर उलटला . या अपघातात टँकरचालक जखमी झाला . अपघातानंतर घाटातील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती . टँकरमध्ये ज्वालाग्राही रसायन होते . त्यातील थोडे रसायन टँकरमधून बाहेर पडल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या वहातूक पोलिसांनी खेडच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते . अपघात झाल्यानंतर काहीकाळ मुंबईच्या दिशेने जाणारी व येणारी वाहतूक नातूनगर विन्हेरे मार्गे वळविण्यात आली होती . वाहतूक पोलिस उपनिरीक्षक पी . एस . धडे , सहायक पोलिस फौजदार समिल सुर्वे व त्यांचे सहकारी यांनी परिस्थितीवर व घाटातील वाहतूकीवर नियंत्रण ठेवले .
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात