मुंबई : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. दरम्यान, कुर्ला (Kurla) पश्चिमेत सीएसटी रोडवर परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यामुळं सीएसटी रोड परिसरात रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं आहे.
कुर्ला परिसरामध्ये अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यामुळं कुर्ला सीएसटी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. सध्या कुर्ला परिसरात पावसाचे जोर कमी झाला आहे. त्यामुळं सीएसटी रोडवर भरलेलं पाणी कमी होत आहे.
सध्या राज्यात पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी खरीपाची पिकं (Kharif crops) वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. पुढील संपूर्ण पंधरवडा म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकण आणि काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसा व्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात