अखेर कोळंबे सोनगीरी ग्रामपंचायत मध्ये सोमवार दिं २८.०८.२०२३ रोजी सकाळी ०९:४५ वाजता कोळंबे हाय स्कूल वस्तीगृह येथे विशेष ग्रामसभा होणार…
संगमेश्वर- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार १.कलम ७ व सभा नियम १९५९ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्यावा लागतात परंतु संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सोनगीरी गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित असताना १०० नागरिकांची पूर्तता होत नाही त्यामुळे कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात येते आणि पुन्हा दुसऱ्या इतर वेळेत कमीतकमी उपस्थितीत मन मर्जी प्रमाणे योजना फिरवून ठराव घेतले जातात.बऱ्याचशा योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचत देखील नाहीत , कोणत्याही आर्थिक अहवालाची सक्षम मांडणी , ग्रामस्थांच्या मूलभूत हक्क, योजना आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बहुतांश वेळा टाळण्याचा प्रयत्न केला जातो.कोणत्याही प्रश्नांची सद्यस्थिती कार्यरत असलेले सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच व उपसरपंच समाधानकारक उत्तर देत नाहीत परिणामी गाव आणि ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत
राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, पंचायत समिती मधील योजना , घरकुल यादी मंजुरी , रस्ते दुरुस्ती , जल जीवन , महिला व कुटुंब कल्याण, बचत गट, आरोग्य आणि शिक्षण या संबंधित ठराव मंजूर करण्यासाठी ग्रामसभा होणे गरजेचे असते.
ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्थरावर गावाच्या विकासाकरिता खर्च केलेला निधी तसेच वार्षिक विकास आराखडा , वित्त आयोगाचा निधी कशा प्रकारे खर्च केला यासाठी ग्रामसभा होणे गरजेचे आहे
कोळंबे सोनगीरी समन्वय युवा सामाजिक संघटना व ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
देखरेखीखाली एक समिती स्थापन करून विशेष ग्रामसभेचे नियोजन करावे अशी विनंती करण्यात आली ती ग्रामसभा सोमवार दि. २८.०८.२०२३ रोजी सकाळी ०९:४५ वाजता कोळंबे हायस्कूल वस्तीगृह येथे आयोजित करण्यात आली आहे.स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी यांनी या ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती कोळंबे सोनगीरी संघटनेचे सरचिटणीस श्री. प्रनिल पडवळ यांनी केली आहे.