
मुंबई : ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी बुधवारी रात्री वाहतुक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पुलाचा गर्डर टाकण्यासाठी १४० टनाच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. अप जलद आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. बुधवारी रात्री अप ट्रान्स हार्बर मार्ग आणि ५ व्या रेल्वे मार्गावर तसेच ठाणे स्थानकातील फलाट ६ आणि ७ वर रात्री ११.५५ पासून गुरुवारी पहाटे ४.५५ वाजेपर्यत ब्लॉक राहणार आहे.
या दरम्यान मुंबईत येणाऱ्या हावडा -मुंबई एक्सप्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस, चैन्नई- मुंबई एक्सप्रेस आणि पुडुचेरी -दादर एक्सप्रेस सहाव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. याशिवाय मुंबईतून जाणाऱ्या मुंबई-मडगाव , लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी तेजस एक्सप्रेस पाचव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.
जाहिरात




जाहिरात
