राधाकृष्ण विखेंचा थोरातांवर निशाणा.
जनशक्तीचा दबाव न्यूज | अहमदनगर | जानेवारी ३१, २०२३.
अहमदनगर जिल्ह्यातील दोन मोठे नेते भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये शाब्दिक वाद हे सुरूच असतात. नुकतेच विखेंनी काँग्रेस पक्षावर टीका करताना थोरातांवर निशाणा साधला आहे. राज्यात काँग्रेसचे महत्व कमी करण्यात काँग्रेस नेतेचे सहभागी अशा शब्दात त्यांनी नाव न घेता थोरातांवर टीका केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पुढं बोलताना विखे म्हणाले, राज्यात काँग्रेसचे महत्व आपल्याच काँग्रेसच्या नेत्यांनी संपविले आहे. आणि हे काय मी सांगण्याची गरज नाही आहे.
तसेच येत्या काळात यापेक्षाही अधिक काँग्रेसची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. नाशिक पदवीधर निवडणुकीवरून देखील विखेंनी थोरातांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्ह्यातील स्वयंघोषित नेते यांच्यामध्येच ताळमेळ नाही.
पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला अधिकृत उमेदवार उभा करू शकला नाही. तसेच याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती, ज्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व होत मात्र त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपले विरोधक तसेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.