जनशक्तीचा दबाव न्यूज | औरंगाबाद | जानेवारी ३१, २०२३.
मुस्लिम मराठी साहित्य चळवळ संघटित होऊन ३५ वर्षाचा काळ लोटला आहे. गेल्या ४ दशकात मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची १२ अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये अत्यंत यशस्वी झालेली आहेत.या काळात अनेक मुस्लिम मराठी साहित्यिक मराठीमध्ये अभिव्यक्त होऊन मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भर घालत आहेत.
मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आणि व्यवहाराची भाषा असल्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठी भाषेतच अभिव्यक्त व्हावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने या पंधरावड्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचा अभ्यास करतच जे मुस्लिम विद्यार्थी मराठीमध्ये अभिव्यक्त होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन, प्रशिक्षण,सादरीकरण आणि कौशल्यवाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ३ दिवसीय निवासी शिबिर औरंगाबाद येथे ९, १० व ११ मार्च, २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
विविध महाविद्यालयातील जे मुस्लिम विद्यार्थी सृजनशील आहेत आणि ज्यांना मराठी भाषेत अभिव्यक्त होण्याची, लेखन करण्याची इच्छा आहे अशांसाठी हे शिबिर असणार आहे. अशा मुस्लिम विद्यार्थ्यांनी आपली नावे २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आम्हाला कळवावीत यावी ही विनंती.
या शिबिरामध्ये अनेक नामवंत साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी, गजलकार, नाटककार, विचारवंत आणि वक्ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे निवासी शिबिर विनामूल्य असून विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ करणार आहे.
विविध महाविद्यालयातील सृजनशील मुस्लिम मराठी विद्यार्थ्यांनी आपली नावे ७०४०७९११३७ या WhatsApp क्रमांकावर कळवावीत ही विनंती.
प्रा. लियाकत अली पटेल/ शेख अन्वर जावेद सचिव : मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ
९९२३८०३३४७ / ९८२३०७३८८२