
संगमेश्वर दि 16 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर )
राज्याचे उद्योगमंत्री – रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संगमेश्वर येथे संपन्न झाले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यालयास जागा उपलब्ध करून देणाऱ्या कार्यकत्यांचे आभार मानले. हे कार्यालय तालुक्याचे विभागीय कार्यालय असून जनतेचे प्रश्न प्रामाणिक पणे सोडविण्याचे प्रयत्न केले जातील.या उद्घाटन वेळेस जिल्ह्याप्रमुख राहुल पंडीत, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, तालुका प्रमुख प्रमोद पवार, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, विभाग प्रमुख बाबू खातू, उपविभाग प्रमुख आतिष पाटणे, शहर प्रमुख संजय कदम, नावडी उपसरपंच विवेक शेरे,मनोहर गीते, संदीप रहाटे,ओझरखोल सरपंच, लोवले, सरपंच, कुरधुंडा उपसरपंच, आंबेड सरपंच, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो – पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संगमेश्वर बाजारपेठ येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना व मान्यवर ( छायाचित्र- मकरंद सुर्वे संगमेश्वर)
➖➖➖➖➖➖➖