
पुर्ये तर्फे देवळे गावातील भूपाल काबदुले यांचा आरोप
संगमेश्वर:- पूर्ये तर्फ देवळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच पाच वर्ष पूर्ण न करता पहिल्यांदा सरपंच पदाचा राजीनामा देऊन सदस्य बनवण्याची नामुष्की ओढवली आहे, हेच ते कारण की ज्यामुळे सरपंचांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु ज्या गटामध्ये सरपंच यांनी पक्षप्रवेश केला त्या गटाच्या पक्षातील लोकांनी सरपंचांना राजीनामा द्यायला लावला नाही, मात्र ज्यांनी सरपंचांना राजीनामा द्यायला लावला त्यांनीच आज स्वतःचे नाक कापून घेतले आहे असा आरोप भूपाल राजाराम काबदुले यानी केला आहे.

भूपाल काबदुले यानी म्हटले आहे की; “सरपंच निवडणुकीमध्ये गावाला नवीन सरपंच मिळाला ज्यांचे शिक्षण अंदाजे सातवी आहे, असे कमी शिक्षण व अनुभव नसलेले सरपंच गावाला मिळाले तर मग त्यांचा सह्या मारण्यापुरती उपयोग करून घेणाऱ्या लोकांकडून भ्रष्टाचार हा होणारच, मात्र अशा भ्रष्टाचाऱ्यांना दणका देण्यासाठी आज गाव जागृत होऊन अनेक ज्येष्ठ नागरिक व नवयुवक पुढे येत आहे. मात्र पैशासाठी लाचारी करणारे आज याच भ्रष्टाचारांना साथ देत आहेत हेच आपल्या गावाचे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आज आपल्या गावामध्ये विकासाच्या नावाखाली आपापसामध्ये भांडण लावणे, केसेस करणे व गावामध्ये ताण तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे”.