रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर येथे अधिक मासानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले..

Spread the love

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर येथे श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने यावर्षी अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी मंदिरात धार्मिक उत्सव उत्साहात साजरे करण्याचे ठरवण्यात आले याकरिता अधिकमास उत्सव कमिटी तयार करण्यात आली त्याप्रमाणे राधाकृष्ण मंदिरात गेले महिनाभर अभिषेक नामस्मरणे श्रीपाद वल्लभ पारायण भागवत सप्ताह पारायण नामस्मरण श्री हरिपाठ कीर्तन प्रवचन भजन आधी भरभच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 18 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत श्री राधा कृष्णावर दररोज दुधाचा अभिषेक करण्यात आला या अभिषेक सोहळ्यात अनेक भक्तांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली व अभिषेकाचे पवित्र कार्य पार पाडले भागवत सप्ताह निमित्त 29 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत सौ सायली मुळे दामले यांचे रसाळ वाणीतील प्रवचनाला सात दिवस भक्तांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

शनिवारी 5 ऑगस्ट रोजी श्री विष्णू यागाचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने पार पडला श्री संतोष रेडीज व सौ प्रिया रेडीज या दांपत्याने या यागाचे यजमान पद भूषवले होते हा याग स्मरणीय ठरला आकर्षक पूजा व होमाच्या आहुत्यानी संपूर्ण मंदिर परिसरात एक वेगळ्या प्रकारचे सुगंधित वातावरण निर्माण झाले होते यावेळी भाविकांनी यागाचे दर्शन घेण्यासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती अधिक मासाच्या निमित्ताने यावेळी श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण दिनांक 18 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत श्री स्वामींच्या आदेशाप्रमाणे करण्यात आले या पारायणासाठी दररोज नित्यनेमाने भाविकांनी चार ते पाच या वेळात हजेरी लावून एकूण 57 पारायणे स्वामींच्या कृपेने पार पडली या धार्मिक कार्यक्रमात ओम नमो भगवते वासुदेवाय! या जपाच्या एक लाख जपाचा संकल्प करण्यात आला होता परंतु भक्तांच्या हातून हा जप सोळा लाखापर्यंत लीलया पार पडला त्यामुळे श्रद्धा असेल तर अशक्य नाही हे या निमित्ताने दिसून आले दोन दिवस रत्नागिरीतील इस्कॉन मंडळींचे भजन व राधा कृष्णाचा गजर ऐकण्यासाठी भाविकांनी हजेरी लावली होती.

सर्वात महत्वाचा श्री राधा कृष्णाला 56 भोगाचा नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी पार पडला भक्तांनी बनवलेले वेगवेगळे छप्पन पक्वानाच्या पदार्थांचा भोग भक्तिमय वातावरणात श्री राधाकृष्णाना अर्पण करण्यात आला
यावेळी ओंकार संसारे यांच्या सुमधुर आवाजातील भजन व बासरी वादनाने संपूर्ण मंदिरच परिसर भक्तिमय झाला होता एकूणच अधिक मासाच्या निमित्ताने श्री राधाकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गेले महिनाभर भाविकांनी अध्यात्मिक आनंद लुटला संपूर्ण महिनाभर चाललेल्या या सोहळ्याची सांगता 15 ऑगस्ट रोजी झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page