रत्नागिरी : श्री.रत्नेश्वर मित्र मंडळ (मुंबई) ग्रामस्थ पडवळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा पहिल्यांदाच कोळंबे पडवळवाडी येथे “पडवळवाडी चषक – २०२३ ” आयोजित करण्यात आला होता.या स्पर्धेत पंचक्रोशी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघांनी हजेरी लावली.अंतिम सामन्यात भंडारी वारियोर्स आणि एन. डी.चॅलेंजर्स यांच्यात अतिशय चुरशीचा सामना झाला परिणामी एन.डी. चॅलेंजर्स ला पराभव पत्करावा लागला व भंडारी वॉरियर्स प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले.
या स्पर्धेची सुरुवात कोळंबे सोनगिरी गावातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली.शनिवारी झालेल्या सर्व सामन्या अखेरीस एन. डी. चॅलेंजर्स उपांत्य सामन्यात पोहोचले परंतु अंतिम सामन्यात अखेरीस हार पत्करावी लागली.संपूर्ण मालिकेत मालिकाविर मनिष सुर्वे (एन डी चॅलेंजर्स), उत्कृष्ट फलंदाज आकीब फोडकर (भंडारी वॉरियर्स) तसेच उत्कृष्ट गोलंदाज आप्पा शिर्के (भंडारी वॉरियर्स) यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले.
या स्पर्धेत प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रुपेशजी जाधव यांच्या हस्ते दोन्ही संघाला पारितोषिक वितरित करण्यात आले तसेच कोळंबे सोनगिरी गावचे सुपुत्र कु.अक्षय पडवळ (गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यात नोंद) आणि वांद्री येथील प्रज्वल सनगरे ( तैलचित्र यात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त) यांचा देखील सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांना गावाच्या विकासासाठी लागणारे सर्वोतपोरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी ग्रामस्थ श्री रामचंद्र पडवळ , श्री गंगाराम पडवळ, दीपक पडवळ , संजय पडवळ, प्रमोद पडवळ (शिक्षक) , विराज पडवळ , विनायक ता. पडवळ , सोहम पडवळ, अनिकेत पडवळ , काशिराम गीते , विष्णू गिजे, तानाजी गीते (जेष्ठ नागरिक), प्रथमेश गिजे, सुनील पडवळ, सुरज पडवळ , दिवाकर पडवळ, सुजल गिज्ये, स्वप्नील पडवळ,राजेंद्र पत्ये , दर्शन पडवळ , अर्णव पडवळ तसेच मुंबई मंडळाकडून प्रणिल पडवळ, चेतन पडवळ, वैभव पडवळ, गजानन पडवळ,राकेश पडवळ, दीपक पडवळ (बाबू), अक्षय पडवळ, समीर पडवळ, अमोल पडवळ, प्रकाश गीते, शशिकांत गीते, मंगेश पडवळ,संदेश पडवळ, विशाल गीते, रमेश पडवळ, विशाल पडवळ, राजेंद्र टाकळे यांनी मोलाचे सहकार्य केले.