पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या मातृ वंदना योजनेच्या उद्घाटना संदर्भात चर्चा करण्यात आली.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील आरोग्य विषयक केंद्र आणि राज्य शासनाच्या असलेल्या विविध योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते मातृ-वंदना योजना या योजनेचे उद्घाटन होणार आहे.
याबाबत नियोजना संदर्भात तसेच केंद्र शासनाकडून गोरगरीब जनतेसाठी असलेल्या आरोग्य विषयक योजना आरोग्य विमा आणि आभा कार्ड याबाबतीत आरोग्य अधिकारी यांच्याबाबत चर्चा करण्यात आली जिल्ह्यातील लाभार्थी यांना येणाऱ्या अडचणी आणि त्याबाबत प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.
नागरिकांना शासनामार्फत आरोग्य विषयक वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. त्याचा फायदा जिल्ह्यातील हजारो लोकांना होत आहे. याबाबत लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,भाई जठार, सुजाता साळवी, दादा ढेकणे, सुशांत पाटकर,सतेज नलावडे,संकेत कदम, शिल्पा मराठे, सौ. बेर्डे, सौ. तोडणकर, आदी उपस्थित होते.