सकाळी शौचास गेले, ते परतलेच नाहीत; वृद्धाला एक सवय महागात पडली; जागीच मृत्यू

Spread the love

जळगाव: रेल्वे रुळाजवळ शौचालयाला बसणे वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ६० वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार सकाळी आठच्या सुमारास जळगाव शहरातील पिंप्राळा पसिरातील रेल्वे लाईनजवळ घडली आहे. अशोक नंदलाल चव्हाण असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते जळगावमधील धरणगाव तालुक्यात खंडेराव नगरात वास्तव्यास होते.
अशोक चव्हाण पत्नी, मुलगा व सुना यांच्यासोबत खंडेराव नगरात वास्तव्याला होते. मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास अशोक चव्हाण घरापासून जवळ असलेल्या रेल्वे रूळाजवळ शौचालयासाठी गेले. दरम्यान, धावत्या रेल्वेचा डोक्याला फटका बसल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. परिसरातील राहणारे तरुणांनी अशोक चव्हाण यांची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे, निलेश पाटील करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page