
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा दातीवली येथील नाईक नगर येथे कृष्णा अपार्टमेंट इमारतीच्या पाचव्या मजल्यावर वय वर्षे अंदाजे ३० अनोळखी इसम बेशुध्द अवस्थेत आढळून आला. त्यास उपचारासाठी नजिकच्या इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी मुंब्रा पोलिस ठाणे अंतर्गत प्रसिद्धीस देण्यात आले आहे. सदर इसमाच्या वर्णन अंगावर पिवळ्या रंगाचा टी-शर्ट असून त्यावर किल्ला व्यायाम मंदिर होलोग्राम लोगो असून निळ्या व लाल रंगाचे अंतवस्त्र आहे. दाढी व मिशी वाढलेल्या अवस्थेमध्ये आहे
सदर इसमास कोणी ओळखत असल्यास किंवा कुटुंबांची माहिती असल्यास त्वरित पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मो. 8767231667 किंवा लीलाधर सोळूखे मो. 8975578100 भ्रमणधवनी क्रमांकावर संपर्क करावा असे मुंब्रा पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे
जाहिरात

जाहिरात

जाहिरात
