
मकरंद सुर्वे, संगमेश्वर-
ऑनलाईन कार्यक्रमास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती.




संगमेश्वर रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांची अलोट गर्दी. भाजपा संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, रत्नागिरी जि.प.चे माजी उपाध्यक्ष श्री. राजेश मुकादम, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये, सौ. कोमल रहाटे, मा. उपनगराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये, ग्रा.पं. धामणीचे सरपंच श्री. संतोष काणेकर, ग्रा.पं. नावडीचे उपसरपंच श्री. विवेक शेरे, डॉ. अमित ताठरे, सा.बां.वि. देवरुखच्या उपअभियंत्या श्रीम. पुजा इंगवले यांची प्रमुख उपस्थिती.

संगमेश्वर | ऑगस्ट ०८, २०२३.
कोकण रेल्वे ही कोकणाच्या लोकांसाठी एक वरदानच समजली जाते. या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. अशात प्रवाशांना योग्य सुविधा मिळणे काळाची गरज आहे हे ओळखून देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ नुकताच मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास कार्यक्रम जाहीर केला. यालाच सकारात्मक प्रतिसाद देत मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात सा.बां. विभागाने कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या पायाभूत सुविधांचा विकासासाठी प्रकल्प हाती घेतला असून दृकश्राव्य पद्धतीने त्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सदर विकास हा अतिजलद करण्याचा राज्यसरकारचा मानस आहे. जास्तीतजास्त काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करून चाकरमान्यांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब या कार्याचे संचालन करत असल्याने त्यांचे संपूर्ण नियंत्रण रहाणार आहे. महायुती सरकारचा कारभार लोकोत्तर आणि गतिमान असल्याची शाश्वती या माध्यमातून कोकणच्या बांधवांना मिळणार आहे.” मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ करताना माहिती दिली, “कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे. कोकण रेल्वेचा प्रवास याच सौंदर्यामुळे सुखकर होतो. पर्यटनाच्या दृष्टीने रेल्वे स्थानकांच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आवश्यक होते. आणि त्यामुळेच हा क्रांतिकारी प्रकल्प केंद्रीय योजनेला पूरक ठरेल असा मला विश्वास वाटतो. रेल्वे स्थानकांना रस्त्यांची जोडणी झाल्यामुळे चाकरमानी यावेळी नक्कीच प्रभावित होतील. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांचा विकासही गणपतीपूर्वी करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.




यावेळी रत्नागिरी (द.) मधील चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापुर येथे हजारो सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, सा.बां. विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संगमेश्वर रेल्वे स्थानकावर जवळपास ५००हून अधिक लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. यामध्ये अमित केतकर, मिथुन निकम, सतीश पटेल, रूपेश कदम, अनुप प्रसादे, कडवईचे मा. सरपंच वसंत उसगांवकर, तुरळचे मा. उपसरपंच शंकर लिंगायत, वाशी तर्फे संगमेश्वरच्या सरपंच तन्वी गानू, प्रशांत रानडे, अनिल घोसाळकर, संतोष जाधव, संजय (बापू) सुर्वे, संजय इंदुलकर, योगेश मुळे, शीतल दिंडे, धामणीचे मा. सरपंच गौतम कांबळे, सौ. स्नेहा फाटक, सौ. श्रद्धा इंदुलकर, सौ. नुपुरा मुळ्ये, महेंद्र (पप्पू) पकडे, श्रीधर कबनूरकर, अमोल गायकर, सुधीर यशवंतराव, दीपक वेल्हाळ, अविनाश गुरव, यशवंत गोपाळ, भगवंतसिंग चुंडावत, निखिल लोध, राहुल फाटक, शाखा अभियंता अक्षय बोडसे आदी प्रमुख कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ, व्यापारी, आणि स्थानकातील प्रवासी उपस्थित होते.