
नवी दिल्ली; काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयकडून सोमवारी पडताळून पडताळणी केली. त्यानंतर खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यामुळे राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.
सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली त्यानंतर त्यांची खासदारकी पुन्हा बहाल कधी होणार? याची राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज राहुल गांधींना लोकसभेच्या सचिवालयकडून खासदारकी बहाल करण्यात आली आहे. 8 ऑगस्ट..म्हणजे संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 2014 नंतर मोदी सरकारच्या विरोधातला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार आहे.
जाहिरात
