सांगमेश्वर ता – संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावचे गुरुकृपा आर्ट चे मालक तसेच प्रसिद्ध गणेश मूर्तिकार श्री प्रदीप विश्राम चंदरकर यांच्या कारखान्याला २६ वर्ष पूर्ण झाले असून 27 वर्षात पदार्पण करून यशस्वी वाटचाल केली आहे प्रदीप चांदरकर हे परचुरी गावचे विद्यमान उपसरपंच आहेत तसेच विविध सामाजिक कामात सहभागी असतात ते निरंकारी अनुग्रहीत आहेत लहानपणीच शाळा शिकत असताना वडील कैलासवासी विश्राम चांदरकर यांचे छत्र हरपले श्री प्रदीप जी यांना चित्रकलेची आवड श्रीमती कमलळजाबाई पांडुरंग मुळे विद्यालय कोळंबे हायस्कूल इथे शिकत असताना निर्माण झाले शाळा सोडल्यानंतर माती कामाची सुरुवात वयाच्या 16 वर्षी सुरुवात केली आई यांचे प्रोत्साहन मिळाले व पाठीशी उभी राहिली आणि 11 गणपतीने सुरवात केली पत्नी ,मुलगा राजन मुलगी प्रांजल यांची ह्या कामात उत्तम मदत मिळते .
राजन व सेजल कलेची जोपासता करत आहेत सध्या कारखान्यात 250 हुन अधिक मूर्ती शाडू माती पासून साकारलेल्या आहेत ओझरखोल कोळंबे गाव मळा कुरदुंडा उक्षी वांद्री फुणगुस व खाडीपट्टा आधी विविध गावातून गणपती लोक नेत असतात श्री प्रदीप जी यांनी गोवा येथे विविध मंदिरे इमारती बोटी आधी कामांमध्ये उत्कृष्ट कलाकुसर अनेक वर्ष केलेले आहे गणपतीचे आकर्षक रंगकाम व उत्कृष्ट हस्तकला यामुळे तालुक्यातून गणपतीला मागणी आहे.
सध्या गावातील मुले शिकत आहेत गुरुकृपा आर्ट चा २५ वा महोत्सव श्री प्रदीप विश्राम चंदरकर यांनी गावचे माननीय सरपंच उपसरपंच सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावचे विविध संस्थांचे पदाधिकारी माजी सैनिक पत्रकार व लोककलावंत शाहीर गुरु व शिक्षक या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन मोठा उत्साहात साजरा केला होता त्यामुळे आई व गुरुजनांचे डोळ्याचे पारणे फिटले त्यांचे आध्यात्मिक गुरु सुदिक्षा जी महाराज आहेत यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद यांना मिळत आहेत प्रदीप जी यांनी ही कला जोपासली आहे व वाढवली आहे कारखान्याचा उत्कर्ष होत आहे अनेक मान्यवर या ठिकाणी भेटी देतात काही पत्रकारानि कारखान्याला भेट देऊन अमृत महोत्सवी कलेचा गौरव केला होता