
निवडणूक आणि परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्याकडे लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) महापालिका साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या बुधवारी करण्यात आल्या असून यामध्ये नौपाडा, दिवा, लोकमान्यनगर, वर्तकनगर आणि माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात या सर्वांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
निवडणूक आणि परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्याकडे लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक सोपान माईक यांच्याकडे साहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. वर्तकनगर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली आहे. महापालिकेत नवीन रुजू झालेले अभिजित खोले यांची वर्तकनगर प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. दिवा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त पदी अक्षय गुडधे यांची नेमणुक करण्यात आली आहे.
प्रीतम पाटील यांचा दिवा प्रभाग समितीचा पदभार काढण्यात आला असून त्यांची माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये बदली करण्यात आली आहे.
जाहिरात

जाहिरात
