मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.यामध्ये महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खेड भोस्ते घाटात ट्रक आणि कंटेनर खड्ड्यात कोसळले दोन जणांना मृत्यू
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले. यातील कंटेनरमध्ये तीन जण अडकले होते. या तिघांनाही पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने यांच्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माशांचे जाळे घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा हे रेस्क्यू ऑपरेशन संपले. येथील एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. खेडचे पोलीस निरीक्षक भोयर आणि सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
भोस्ते घाट उतरत असताना अवघड वळणाच्या काही अंतर अलीकडे महामार्गाच्या डाव्या बाजूला मोठ्या खड्ड्यामध्ये आयशर टेम्पो तब्बल ३५ ते ४० फूट खड्ड्यात कोसळला. त्या पाठोपाठ लॉजिस्टिक कंटेनर देखील पलटी झाला. एका टेम्पोमध्ये समुद्राच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी लागणारे मोठे जाळे होते. तसेच काही लोकांचे वाचवा वाचवा म्हणून आवाज देखील येत होते, असे बचाव कार्यातील काही उपस्थितांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर खेडमधील तरुणांनी तसेच मोरवंडे बोरस परिसरातील मदतगार तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच इतर वाहन चालक देखील थांबले होते. अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम तब्बल दीड तास सुरू होते. टेम्पोमधील माशांच्या जाळ्यामध्ये हे लोक घुरफटले असल्यामुळे मदतकार्यास मोठा अडथळा येत होता. एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जाहिरात