
संगमेश्वर: संपूर्ण महाराष्र्टात प्रसिद्घ असणारे श्री क्षेत्र मार्लेश्वर हे ठिकाण आता श्रावणात भाविकांच्या आगमनाने गजबजून जाणार आहे. मात्र या ठिकाणी येण्यासाठी रस्ताच सुस्थितीत नाही. देवरुख ते आंगवली मठ हा रस्ता चांगला आहे. मात्र मठापासुन मार्लेश्वर रस्ता खड्डेमय झाला आहे. भाविकांना याच खडतर मार्गाने यावे लागणार आहे. क दर्जाचे हे ठिकाण असुनही सुविधांची वानवाच आहे.
आमदार, खासदार यांच्याकडे कागदावर प्लॅन तयार आहे, मात्र वास्तवात भाविकांना खड्डेच दिसत आहेत.
निवडणुकीला पहिला नारळ मार्लेश्वर चरणी अर्पण केला जातो नंतर मात्र पाठ फिरवली जाते..
खरेतर मारळ ग्रामपंचायत व देवस्थानने यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. येणार्या भाविकांकडुन कर मिळतो, देणगी मिळते याचा विनियोग सोई सुविधांसाठी करायला हवा तो होताना दिसत नाही..
पश्चिम महाराष्ट्रातुन जे भाविक येतात तो ही मार्ग खड्डेमय आहे. बांधकाम विभाग यासाठी काही करणार आहे का.? असा सवाल भाविक विचारत आहेत..
आता श्रावणातले सोमवार मार्लेश्वरला गर्दी होणार आहे. खड्डेमय मार्गाने भाविकांना यावे लागणार आहे. हा रस्ता कधी चांगला होणार हे काही सांगता येणार नाही. पर्यटन वाढले पाहिजे असे फक्त बोलले जाते मात्र सोयी सुविधा यांची कोणी दखल घेत नाही हे विशेष आहे..
कागदावरच्या योजना प्रत्यक्षात कधी साकार होणार हे काही सांगता येणार नाही..
हा श्रावण खड्ड्यातुनच हिरवा निसर्ग अनुभवायला लागणार आहे..
बांधकाम विभागाने याची पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे..